top of page

।। शूर आम्ही सरदार ।।

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती,

देव देश अन् धर्मापायीं प्राण घेतलं हातीं ।।ध्रु।।

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रित

तलवारीशीं लगीन लागलं जडली येडी प्रीत

लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती

देव देश अन् धर्मापायीं प्राण घेतलं हातीं ।।१।।

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती,

देव देश अन् धर्मापायीं प्राण घेतलं हातीं ।।ध्रु।।

जिंकावे वा कटून मरावं हेंच आम्हाला ठावं

लढून मरावं मरून जगावं हेंच आम्हाला ठावं

देशापायी सारी इसरू माया ममता नाती

देव देश अन् धर्मापायीं प्राण घेतलं हातीं ।।२।।

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती,

देव देश अन् धर्मापायीं प्राण घेतलं हातीं ।।ध्रु।।

bottom of page