
|| श्री संभाजीसूर्यहृदय ||
मृत्युस हि न डरले मनीं धर्मवीर |
फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर ||
दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा |
म्हणुनी उरांत धरुं या शिवसिंहछावा ||१||
गिळण्यास प्राण उठला जरी ही कृतांत |
संभाजी धर्म जगले जळत्या राणांत ||
सूर्याहूनी ही अति दाहक धर्मभक्ति |
स्फुरण्यास नित्य धरुयां शिवपुत्र चित्ती ||२||
राष्ट्रांत धर्म जणू हां शरीरात प्राण |
ही निर्मू हिन्दुहृदयी अति तीव्र जाण ||
संभाजी छत्रपती म्लेंच्छवधार्थ लढले |
धर्मार्थ देह त्यजुनि ध्वजरूप झाले ||३||
हिन्दू म्हणूनी जगण्या तव वृती देई |
सिंहासमान जगण्या तव तेज देई ||
शिवपुत्र ! द्याल उरीचे जरी धैर्यमर्म |
मारुनी म्लेंच्छ अवघे रणी रक्षु धर्म ||४||
प्राणांति ही न फिरणे कधी मार्गी मागे |
रविवत बना पथी तुम्ही शिवसूत सांगे ||
उध्वस्त तोडनी करा रणी म्लेंच्छपाश |
संपूर्ण हिन्दवी करा आपुला स्वदेश ||५||
जाळून राख करण्या जगीं म्लेंच्छसत्ता |
हिन्दुमनास् शिकवू शिवपुत्रकित्ता ||
राष्ट्रातले न उखडू जरी मलेंच्छविष |
टिकणार नाही कधी ही जगी हिंदूदेश ||६||
संभाजीजाळ तदवत शिवसूर्यजाळ |
निर्मुनी हिन्दू हृदयी बनु म्लेंच्छकाळ ||
हे हिन्दुराष्ट्र करुनी यवानांतकांचे |
संकल्प पूर्ण करुया शिवभूपतींचे ||७||
विसरु कसे कधी आम्ही शिवबाव्रताला |
सोडु कधी न कधी ही धरिल्या पथाला ||
शिवसूर्य चित्ती तळपे नित अस्तहिन |
प्राणासमान आमुच्या उरी राष्ट्रध्यान ||८||
मृत्युजिभेवरी जिणे जगले अखंड |
उध्वस्त नष्ट करण्या रणी म्लेंच्छ बंड ||
शिवसिंहसदृश्य करू अवघा स्वदेश |
हिंदुत्वशत्रु सगळे करु नामशेष ||९||
विघ्ने असंख्य जरी ही पथ चालताना |
घालू न भिक कधी ही यमयातनाना ||
धर्मार्थ आयु बलिदान करूं सहर्ष |
संभाजी, बाजी, शिवबा रविवत आदर्श ||१०||
झुंझार जात आमुची शिवशार्दुलांची |
अंत्येष्टी निश्चित करे रणी पाकतेची ||
मारुनि शत्रु अवघे समरांत ठार |
दुर्दांत हिन्दू कुळ हे जग जिंकणार ||११||
शस्त्रास् तहान आमुच्या अरिशोनिताची |
शमणार प्राशुनी कुळी रणी म्लेंच्छतेचि ||
खड्गात नित्य वसते तुळजाभवानी |
हे दिव्य सत्य कथिले शिवभुपतिनी ||१२||
गंगाजलात नसतो मळ वा विषार |
सूर्यात शिरकु न शके घन: अंध:कार ||
नकुलास सर्प न धजे कधी दंषण्याला |
संदेह स्पर्शु न शके शिवपाईकाला ||१३||
जळल्या विना न उजळे जगतांत काही |
मातीत बिज कानिसा स्तव नष्ट होई ||
झिजताच सौरभ सुटे खलु चंदनाचा |
संभाजीमार्ग आमुचा ही समर्पणाचा ||१४||
लाचार होउनी कधी, कधी ना जगावे |
त्याहुनि विष गिळूनि त्वरया मरावे ||
शिवसिंह सदृश्य बनु अति स्वाभिमानी |
संभाजी नाही झुकले यमयातनानी ||१५||
खड्गहुनि ही करण्या मन धारदार |
भाल्याहुनि ही बनण्या मन टोकदार ||
वज्राहुनी ही घडण्या मन हे कठोर |
धर्मार्थ प्राशन करू शिवपुत्रसार ||१६||
गोमायु श्वान म्हणुनी जगणे न दीर्घ |
हे हिन् तुच्छ जगणे इहलोकी नर्क ||
जगणे जगांत समयी क्षणभर असावें |
वनराज वा गरुड़ होऊनी जगावें ||१७||
डोळ्यांत दृष्टी आमुच्या शिवशार्दुलांची |
चित्तांत वृत्ति निवसें सईंच्या सुताची ||
हृदयात मूर्ति विलसे प्रिय मायभूची |
आतुर हाक श्रवण्या वढुरायगडाची ||१८||
भगव्या ध्वजास्तव लढु रणी शत्रु मारू |
झुंजानि लाख समरे आम्ही धर्म तारु ||
खाली न खड्ग कधिही कधी ठेवणार |
शिवपुत्रपाईक आम्ही जग जिंकणार ||१९||
वढूची चिता धगधगे हृदयात नित्य |
संभाजीजाळ धगतो उरी चित्ती तप्त ||
जाणून तहान भूक त्या वढुच्या चितेची |
संपूर्ण राख करूया रणी म्लेंछ्तेची ||२०||
कशासाठी आणि मरावे कसे मी ?
विचारू स्वता:ला असा प्रश्न नेहमी ||
लढु पांग फेडावया धर्मभूचे |
आम्ही मार्ग चालु सईंच्या सुतांचे ||२१||