top of page

सुखासीनता पूर्णतः घातकारी ।

मने भयकुनी लोक होती विकारी ।।

जगीं लोक जे इंद्रियांच्या अधीन ।

अशांच्यामुळें मायभू होई क्षीण ।।१।।

 

आहे कां कुणी भोवताली उपाशी ।

स्वतः जेवताना विचारा मनाशीं ।।

नसावे कधीं ही मनानें अधाशी ।

असें आत्मनाते असावे जगाशी ।।२।।

 

अलंकार वस्त्रे तनू भूषविती ।

तनुप्राणशक्ती न ते वाढविती ।।

विना राष्ट्रनिष्ठा असें जो विकास ।

तयानें पुरा देश होई भकास ।।३।।

 

जगावे कधीं ना स्वतःच्या सुखार्थ ।

जिणें धन्य तें, जें जगाच्या हितार्थ ।।

तरु वेंली गाई नद्या चंद्र सूर्य ।

उरीं साठवूं या जगाया आदर्श ।।४।।

 

पेराल ते उगवते,खलु विश्वसत्य ।

मातानुसार उपजे उदरीं अपत्य ।।

इच्छा तशी फळे मिळतात जाणा ।

हें जाणूनी धरू उठा शिवसूर्यबाणा ।।५।।

 

पुठ्ठा न रक्षूं शकतो कधीं ग्रंथज्ञान ।

पदशक्ती वाढू न शके जरी पायीं वाहाण ।।

सर्वांस प्राप्त जरी हि गृहवस्त्र अन्न ।

निष्ठा विना न बनते जगीं राष्ट्र महान ।।६।।

 

नका नीती तत्वे लिहूं पुस्तकांत ।

त्वरें आचरावी स्वतः जीवनांत ।।

नको धर्मचर्चा वृथा आयु जाई ।

आचारातुनी धर्म बलवान होई ।।७।।

 

नसे इंग्रजी दूध हें वाघिणीचे ।

खरे पाहता वीष तें दास्यचेचे ।।

असे देववाणी झरा अमृताचा ।

पिऊनी बने देश मृत्युंजयांचा ।।८।।

( देववाणी- संस्कृतभाषा )

कशी वाती वाचून तेवेल ज्योती ।

कशी मातीच्या वाचूनी होई शेती ।।

विना प्राण ना देह राहे जिवंत ।

विना धर्म ना देश होई ज्वलंत ।।९।।

 

नसे ज्या मनीं देश धर्माभिमान ।

असें सर्व तें या जगीं शुद्र श्वान ।।

धन्याशीं असे श्वानही एकनिष्ठ ।

असे शिक्षितांच्याहुनी श्वान श्रेष्ठ ।।१०।।

 

किती हि जरी सत्य हें श्रेष्ठ जाणा ।

विना शक्ती तें बोंब मारी ठणाणा ।।

किती हि जरी गाय ही क्षीरशाली ।

तिला पाहिजे रक्षण्या  कोणी वाली ।।११।।

 

जिभे सारखे नाही कोणी खट्याळ ।

जिला जन्मतः वासनेचा विटाळ ।।

जरी ती बसे बत्तीशी पिंजऱ्यांत ।

फसवते कुणाला हि बघता क्षणांत ।।१२।।

 

जधी सिंह होई नखे दंतहीन ।

तया मारते फाडूनी शुद्र श्वान ।।

उठा हिन्दुनो! सत्य जाणा त्रिकाल ।

टिकाया जगीं शक्ती मिळवा कराल ।।१३।।

 

विना देव देवालयाला न अर्थ ।

विना ध्येय तें  हि जिणे शुष्क व्यर्थ

जया चित्तीं ना देशधर्माभिमान ।

तयाचे गणावें न मनुजांत स्थान ।।१४।।

 

विषाचे विना कां विषाच्या सहित ।

असा भेद मुंगूस नाणी मनांत ।।

दिसे त्या क्षणीं मारितो पन्नगास ।

वधा म्लेंच्छ हें सत्य सांगे जनास ।।१५।।

( पन्नग-नाग )

  

किती हि जरी द्रव्य लाभे कुणाला ।

परी तृप्तता वाटते ना मनाला ।।

तृषा सागराची कधीं मावळेल ।

तशी मानवाची धनाशा त्रिकाल ।।१६।।

 

आम्ही वीतरागी बनूं कर्मयोगी ।

तनानें मनानें बनूं या निरोगी ।।

मनानें पुरा देश विकलांग रोगी ।

करूं या त्वरें राष्ट्र शिवभूपयोगी ।।१७।।

 

लढावूं चढावूं करू हिन्दुजाती ।

धृतीनें करूं म्लेंच्छ जातीसमाप्ती ।।

अरीनाश ना ध्यास ज्यांच्या मनात ।

कळें हें न तें, राष्ट्र जाई लयास ।।१८।।

( धृती-निश्चय,अरि-शत्रू )

 

अलंकार देहास शृंगारण्याला ।

कशाला हवें तें असें शील ज्याला ।।

फुलांच्या सवें वेली शोभे नितांत ।

शीला सारखा दागिना ना जगांत ।।१९।।

 

विना वासनाअंत ना कोणी संत ।

जया देहबुद्धि म्हणा भोगजंत ।।

रविवत् जगे जो जगाच्या हितार्थ ।

तया संत हें नाव शोभे यथार्थ ।।२०।।

 

विवेके त्यजूं मोह आसक्ति दोन्ही ।

उरीं चेतवू ज्ञानवैराग्यवह्नि ।

मतीला हावें 'नीतीनेतृत्व' नित्य ।।

तरी धर्म वाढे, टिके न्याय सत्य ।।२१।।

 

सुखाच्या सदा पाठलागांत मग्न ।

असे सर्व प्राणी मनामाजीं भग्न ।।

सुखा एवढी भ्रांती नाही जगांत ।

फसावे न केंव्हा मृगाच्या जळात ।।२२।।

 

निसरड्यावरी पाय पडता पडाल ।

तसें कांचनाच्या मृगाने फसाल ।।

मनीं मोहशेवाळ साचूं न द्यावें ।

तपाच्या जळानें मनाला धुवावें ।।२३।।

स्तुतीनें कधींही न हुरूळूनी जावे ।

टिकेनें मनीं ना कधीं क्षुब्ध व्हावे ।।

पयानें जलाब्धी, ढगानें गभस्ती ।

स्वभावें कधीं ना विकारीत होती ।।२४।।

( जलाब्धी-समुद्र,गभस्ती-सूर्य )

 

असूं वा नसु स्वामी आम्ही जगावे ।

बनूं या त्वरें स्वामी आपुल्या मनाचे ।।

जगीं जो कुणी जिंकू शकतो मनाला ।

अति लीलया जिंकू शकतो जगाला ।।२५।।

 

शोभायमान करतील,न रक्षतील ।

मिळे तो वरी,पेरूं हि भक्षतील ।।

अशा पोपटा सारिखे लोक झाले ।

अशांच्या मुळें राष्ट्र मातींत गेले ।।२६।।

 

स्वतःची फळे ना कधीं वृक्ष खाती ।

नद्या ना स्वतःचे कधीं पाणी पीती ।।

फळाला त्यजूनी करूं कार्य नेहमी ।

जिणें अर्पूनी रक्षूंया मातृभूमी ।।२७।।

 

किती हि जरी क्रोध आला मनांत ।

नका व्यक्तवूं बोलण्या वागण्यांत ।।

दहा अंक मोजा गिळा राग पूर्ण ।

उजाळा मनीं संयमे शांतीस्वर्ण ।।२८।।

 

मना एवढा ना उकिरडा जगांत ।

नको ते असें सर्व त्याच्या कुशींत ।।

त्वरें पेटवूं ज्ञानअग्नी उरांत ।

कराया उकिरडा त्वरें भस्मसात ।।२९।।

 

म्हशीचे रुचीचे नसे कांही नाते ।

जसे गानशास्त्रास जाणें न जाते ।।

गुळाची जशी गोडी ना गर्दभास ।

निधर्मी न जाणे तसा हिंदुतेस ।।३०।।

( जाते - पीठ दळण्याचे जाते )

( गर्दभास-गाढव )

 

कसे श्वाननेतृत्व मानील सिंह ।

तसें मानता तो घडे आत्मद्रोह ।।

तमाच्या कडे सूर्य मागे न भीक ।

आम्ही हिंदू हा चित्ती ठेवू विवेक ।।३१।।

( तम-अंधार, श्वान-कुत्रा )

 

सुखाला त्वरें देऊनि सोडचिठ्ठी ।

धरूं मुंगीवत् राष्ट्रकार्यीं चिकाटी ।।

झिजू चंदनासारिखे रात्रदिन ।

जगूं हिंदुराष्ट्रास करण्या महान ।।३२।।

 

धरुं शत्रूता दुर्गुणांशीं सदैव ।

करूं सद्गुणांशी त्वरें सोयरीक ।।

त्यजू घातकारी मताला पथाला ।

झुगारुं विषाला, पिऊं अमृताला ।।३३।।

 

कणभर मीठ पडता, दूध संपूर्ण नासे ।

गृहकलह जधीं होई,फिरती गेहवासे ।।

खचित जलसमाधी,घेई सच्छिद्र नाव ।

किलमिष मनीं येता,संपतो बंधुभाव ।।३४।।

( गेहवासे-घराचे वासे, किलमिष - संशय )

 

क्षणा एवढें मौलीक कांहीं नाही ।

कळें हें न त्यांचे जिणे व्यर्थ जाई। ।

विनाकर्म क्षण हि नका जाऊं देऊ ।

उठा पूर्ण आयुष्य राष्ट्रास वाहूं ।।३५।।

 

कसें लांडगे शेळी सांभाळतील ।

कसाई कधीं गाय ना रक्षतील ।।

कशी मांजरे उंदरे पाळतील ।

पुढारी तसें देश ना तारतील ।।३६।।

 

जगीं गंध जन्मे फुलांच्या कुशीत ।

तशी करतुकी जन्मतें तळमळींत ।।

जिथें मंत्र शिवबा वसे खोल चित्तीं ।

तिथे जन्मते देशभक्ती विरक्ती ।।३७।।

( करतुकी - कर्तुत्व )

 

म्हणे जो हवा थोडकासा विसावा ।

असा कार्यकर्ता कधीं हि नसावा ।।

नका देहीं केंव्हा अणुमात्र थकवा ।

रवि त्यास्तवें चित्तीं आदर्श ठेवा ।।३८।।

 

कधीं चावते श्वान ना भुंकणारे ।

तसे वर्षती मेघ ना गर्जणारे ।।

तनुदास ते ना रणीं धाव घेती ।

सुशिक्षित सारे कृतीवांझ असती ।।३९।।

( तनुदास- इंद्रियसुखासाठी लाचार होणारा )

 

बैलास कडबा धन्यासाठीं ज्वारी ।

अशी मानवी वृत्ती आहे अघोरी ।।

अति कष्ट त्याला मिळे अल्प मोल ।

जगी 'न्याय' हि सर्वथा शुद्ध भूल ।।४०।।

 

सदा नाग बळकावितो वारुळाला ।

तसे श्वान ताणून मारे सश्याला ।।

जगीं न्याय वागे बळींच्या कलाने ।

बने नीती दासी लवे आर्जवानें ।।४१।।

 

इतिहास वाचू विचारू स्वतःला ।

कसा ऱ्हास आणि किती नाश झाला ।।

उठा हिन्दुनो! संपवू आत्मघात ।

"शिवाजी" स्मरुं मंत्र नेहमी उरांत ।।४२।।

 

जरी माजला बोकड मार्गीं आला ।

नका ठोकरूं घाबरूं व्यर्थ त्याला ।।

तया टाळूनीया त्वरें मार्ग चाला ।

पुढें संधी साधुनी कापा तयाला ।।४३।।

 

जरी कां  पराभूत झाला रणांत ।

तरी ना खचावेंं कधीं हि मनांत ।।

किती हि जरी संकटे घेरतील ।

स्मरुं या उरी नित्य शिवसूर्यशील ।।४४।।

 

गरुडा गिधाडा मधें स्पष्ट भेद ।

जया सूक्ष्म दृष्टी तया होई बोध ।।

बगळे तशीच बदके नसतात हंस ।

कुणी हि कवि ना जसा कालिदास ।।४५।।

मिळे राहवया खावया पंजरांत ।

कसा सिंह राजी असें सर्कशींत ।।

जरी स्वत्व स्वातंत्र्य ना जीवनात ।

जगावें न केंव्हा कुणी या जगात ।।४६।।

 

रुचीहीन लागे मिठावीण अन्न ।

नसे ध्येय तें हि जिणें अर्थहीन ।।

विना नेत्र तो व्याघ्र पडतो दरींत ।

स्मरा सत्य हें नित्य आपुल्या उरांत ।।४७।।

 

मनीं वासनांचा असे जो आसक्त ।

शके कां बनूं पूर्णतः देशभक्त ।।

बुडाला असे भोक हा स्पष्ट धोका ।

अशी नाव कैसी बने युद्धनौका ।।४८।।

 

कसा कोंबडीपोटी जन्मे गरुड I

कसा भ्याड प्राणी करे घोडदौड ।।

ययाति कसा होऊ शकतो विरक्त ।

मुसलमान तैसा नसे देशभक्त ।।४९।।

( ययाति-महाभारतकाळांतील एक विषयासक्त राजा )

 

असे काळ खाण्यास धरणीस भार  ।

खूपे ऐकता राष्ट्रभक्तीविचार ।।

तनू एवढी उंची ज्यांच्या मनाची ।

अशी हीन जाती असे शिक्षितांची ।।५०।।

 

निवडुंग हलव्यास फणसास काटे ।

तिहींच्या उरीं गोडवा नित्य दाटे ।।

मुखी शिक्षितांच्या असे गोड वाणी ।

परी अंतरीं कंटकांच्याच खाणी ।।५१।।

( कंटक-काटा )

 

युद्धांत इंद्रधनु ना उपयुक्त शस्त्र ।

नभ दिक् न होऊं शकते तनुसाठीं वस्त्र ।।

पिकतील ना मृगजळावरी साळी केळी ।।

चित्रातल्या तळीं न मत्स्य धरेल कोळी ।।५२।।

( नभ -आकाश, दिक्-दिशा, साळी-तांदूळ )

सारा समाज ढवळूं घुसळून काढूं ।

जनमानसांत भिनले क्लिबदोष जाळूं ।।

वज्रासमान कणखर दृढतम मनानीं ।

हिन्दुसमाज घडवूं शिवभूपमानी ।।५३।।

( क्लिबदोष - नपुंसकपणाचा दोष )

 

अग्नींत काष्ठ जळते वितळे हि लोणी ।

तद्वत् आसक्तीपदीं हि चळतात प्राणी ।।

मोहादि भीती भवती जरी घेरतील ।

शिवभूपपाईक कधीं कधीं ना ढळेल ।।५४।।

 

 

(आसक्तीपदीं -विषय वासनेची ओढ)

 

कांचनमृगास बघुनी जरी कां भुलाल ।

सीतेसमान चटके जगीं अनुभवाल।।

यमुनाजळांत वसती नित कालियाची।

जाणून निश्चिती करा जळीं पोहण्याची।।५५।।

 

आनंद होईल जगां उदिताच मित्र ।

करितात दुःख घुबडे मिटतात नेत्र ।।

प्राशून कौमुदी चकोर तुडूंब तृप्त ।

चंद्रामृतास बघता मनीं काक त्रस्त ।।५६।।

( उदिताच - उगवताच,मित्र- सूर्य,कौमुदी-चांदणे )

 

घुसळूनी पाणी कधीं काय निघेल लोणी? ।

बोक्यामुखीं न उमटे कधीं वेदवाणी ।।

कडुलिंब वृक्ष कधीं का फळ देई गोड ।

सन्मार्ग चालती कसें जगतीं लबाड? ।।५७।।

 

लावून मिरची कधीं ना उपजेल ऊस ।

मिळती न तांदूळ कधीं जरी कांडू भूस ।।

मंथून वारी कधीं ना मिळणार लोणी ।

विजयी न पार्थ रथीं ना जरी चक्रपाणी।।५८।।

( वारी-पाणी, पार्थ-अर्जुन,चक्रपाणी -भगवान श्रीकृष्ण )

 

उपनेत्र घालूनी कुणी झोपी गेला ।

स्वप्नांत ते न उपयुक्त कदापि त्याला ।।

' हरिदर्शनार्थ ' दुबळे इहचक्षु जाणा ।

उरीं आत्मदर्शन घडे जरी भक्तिबाणा ।।५९।।

( उपनेत्र-चश्मा,इहचक्षु-दोन्ही डोळे )

 

कल्पांतिही पियुष ना कधीं नासणार ।

ना कामधेनु जगतीं कधीं आटणार ।।

वठतो न कल्पतरु ही जशी सत्य गोष्ट ।

हटतील हिन्दु रणीं ना करूं मेंच्छ नष्ट ।।६०।।

( पियुष -अमृत )

लोकजागरण भाग 

bottom of page