top of page

।। रणी फडकती लाखो झेंडे ।।

रणी फडकती लाखो झेंडे अरूणाचा अवतार महान

विजयश्रीला श्रीविश्णूपरी भगवा झेंडा एकची हा ।।ध्रु।।

 

शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची

दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंडयाची

तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता

पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावरचा

लिलेने खंजीर खूपसता मोहक मायेच्या हृदयीं

असंख्य रूधीराच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई

अधर्म लाथेनें तुडवी,

धर्माला गगनी चढवी,

राम रणांगणी मग दावी,

रणी फडकती लाखो झेंडे . . . ।।१।।

 

मुरारबाजी करी कारंजी पुरंदावर हृदिराचीं

सुकली कुठली दौलत नुरली धर्माच्या ध्वजाराजाची

संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी

अमर तयांच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी

खंडोची कुरवंडी कन्या प्रेमे प्रभूचरणावरूनी

स्वामी भक्तिचें तेज अतुल ते चमकत राहो ध्वज गगनी

हे सिंहासन निष्ठेचे,

हे नंदनवन देवांचे,

मूर्तिमंत हा हरी नाचे,

रणी फडकती लाखो झेंडे . . . ।।२।।

 

कधीं न केलें निजमुख काळे पाठ दावूनी शत्रूला

कृष्णकारणीं कधींहि न रणीं धर्माचा हा ध्वज दिसला

चोच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला

जणू जटायू रावण मार्गी उलट रणांगणी हा ठेला

परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे

श्वासाश्वासासह सत्याचे संचरति जगती वारे

गगन मंडळी धाव खरीं

मलीन मृत्तिका लव न धरी,

नभ राजाचा गर्व हरी,

रणी फडकती लाखो झेंडे . . . ।।३।।

 

स्मशानांतल्या दिव्य महाली निजनाथासह पतिव्रता

सौभाग्याचें लेणें निजलें उजळायाला या जगता

रमामाधवासवें चालल्या गगनांतरी जळत्या ज्योती

चिन्मंगलही चिता तळपती या भगव्या झेंड्यावरती

असून नसणे जगून मरणे राख होऊनी पालवणे

जीवाभावाच्या जादुचे ध्वजराजाला हे लेणे

संसाराचा अंत इथे,

मोहाची क्षणी गाठ तुटे,

धूके फिटे नव विश्व उठे,

रणी फडकती लाखो झेंडे . . . ।।४।।

 

ह्या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला

हर हर . . . महादेव

उठा हिन्दूनों अंधारावर घाव निशाणीचा घाला

वीज कडाडून पडता तरूवर कंपीत हृदयांतरे होती

टक्कर देता पत्थर फुटती डोगर मातीला मिळती

झंझावाता पोटी येऊन पान हालेना हातानें

कलंक असला धुऊनी टाकणे शिवरायांच्या राष्ट्राने

घनचक्कर या युध्दांत,

व्हा राष्ट्राचे राऊत,

कर्तृत्वाचा द्या हात,

रणी फडकती लाखो झेंडे . . . ।।५।।

bottom of page