top of page

तमाला गिळोनि जगां उजळावें

 

किती भोवती दाट अंधार ठेला ।                 नद्या या जलाला फुले सौरभाला ।

कसें संपवावे आतां या तमाल ? ।।              विनायाचना देती अवघ्या जगाला ।।

असे ज्योतीनें ना कधीही म्हणावे ।              परार्थाय तूं हि मनस्वी जळावे ।

तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१।।         तमाला गिळोनि जगां उजळावें ।।८।।

 

जरी वादळे येतील विझवाया ।                    तरु वेली गायी नद्या मेघ भानू ।

अति कंप पावली इवलीशी काया ।।           अशांच्या जिण्याला शके कोण वानू ? ।।

तरी हि निरंतर तू तेवत जाळावें ।               अशांच्या जिण्याला उराशीं धरावें ।

तमाला गिळोनि जगां उजळावें ।।२।।         तमाला गिळोनि जगां उजळावें ।।९।।

 

अपेक्षा करावी न तू सोबतीची ।                  तुझे भानूचे आणि वैश्वान्नराचे ।

तुझी नाळ आहे रवीच्या कुळीची ।।           अति आर्त नाते असे अंतरीचे ।।

स्वयंभू स्वयंदिप्त तू कां भीआवे ? ।            अशा तूं कसे चित्तीं उद्विग्न व्हावे ? ।

तमाला गिळोनि जगां उजळावें ।।३।।         तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१०।।

 

युगे आली आणि किती एक गेली ।           अति क्रूर आवर्त विझवू पहाती ।

रवी जान्हवी ना विचलित झाली ।।            कशी झुंझू मी तो अति सान ज्योती ? ।।

द्वयांना निरंतर तू चित्ती स्मरावें ।               आशंकेस या चित्ती येऊ न द्यावे ।

तमाला गिळोनि जगां उजळावें ।।४।।       तमाला गिळोनि जगां उजळावें ।।११।।

 

तुझे अंधाराशी उभे हाडवैर ।                    किती काळ झुंझू अशी एकटी मी  ?।

निरंतर तू करिसी तमावर प्रहार ।।            कशी तेवू मी या अवाढव्य व्योमी ? ।।

तूं कर्मयोगी कधी ना थकावे ।                   स्वतःला मनी दुर्बल कां करावे ?।

तमाला गिळोनि जगां उजळावें ।।५।।        तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१२।।

 

तमाशी कधीचे तुझे द्वंद्वयुद्ध ।                     कधी रावणाच्या कधी कौरवांच्या ।

विनाथांब लढण्यात तूं जगप्रसिद्ध ।।           रूपानें अविष्कार होई तमाचा ।।

वीराग्रणीचे जिणे त्वां जगावे ।                     तदा रामकृष्ण रूपे अवतरावें ।

तमाला गिळोनि जगां उजळावें ।।६।।        तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१३।।

 

चळेना ढळेना कधीही थकेना ।                  कधी मुस्लिमांच्या कधी ख्रिश्चनांच्या ।

नभी भानू जो तो कधीही विझेना ।।             रूपाने अविष्कार होई तमाचा ।।

जळावे कसे ते रवीला पुसावें ।                   शिवाजी संभाजी रूपे अवतरावें ।

तमाला गिळोनि जगां उजळावें ।।७।।        तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१४।।

bottom of page