मराठा म्हणावे अशा वाघराला
दिला एकदा शब्द न पालटावा मनी धर्मनिष्ठा तशी राष्ट्रनिष्ठा
पुढे टाकला पाय मागे न घ्यावा । उरी देवनिष्ठा तशी शीलनिष्ठा
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला सदा कर्मयोगी स्मरे जो ध्रुवाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।८।।
आपत्तीतही पाय मागे फिरे ना मऊ मेणवत बोलण्या वागण्यात
महासागरी धैर्य ज्याचे गळे ना परी फोडतो वज्र ही तत् क्षणात
मिळवितो रणी म्लेंच्छसेना धुळीला गवसणी धजे घालण्याला नभाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।९।।
कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती नसे किर्तीकांक्षी , धनाचा न दास
रणी झेलतो सिंहसा छातीवरती उरी पेटतो हिंदवीराज्य ध्यास
हकारूनी आव्हानतो जो यमाला विसरतो क्षणी देशकार्यी स्वतःला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१०।।
जरी शत्रूकांता प्रसंगी दिसेल सहस्रावधी शत्रू दिसता समोर
तिला साडीचोळी निशी पाठविल तरीही खचे ना उरातील धीर
कधी स्वप्नी न पाप स्पर्शे मनाला उफाळूनी धावे अरी मारण्याला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४।। मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।११।।
महावादळांच्या विरोधात ठाके असे मांड घोड्यावरी नित्य घट्ट
पुढे संकटांच्या कधीही न वाके पवनपुत्रसा गाठतो शत्रू थेट
पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला रणी अर्पितो म्लेंच्छसेना धुळीला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१२।।
धरू खडगधारा वधू शत्रू पूर्ण असे देह तगडा चिवट ताठ बळकट
करू म्लेंच्छसत्ता बळाने विदीर्ण उभट रुंद छाती ग्रीवा घट्ट मनगट
क्षुधा तहान ऐसी ज्याच्या उराला फडामाजी कुस्ती करे तत्क्षणाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१३।।
विना शस्त्र सिंहासवे झुंजणारा वसे धैर्यलक्ष्मी अखंडित चित्ती
मुखातील जिव्हा बळे तोडणारा करे झुंजूनी शत्रूसेना समाप्ती
अलंकार ज्याचे करी खडग् भाला भिती स्पर्शते ना कधी अंतराला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।७।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१४।।
सदा संतचरणी त्वरे ठेवी माथा रणी धर्म रक्षावया झुंजणारा
वधे देवद्रोही स्वये म्लेंच्छकुत्ता टिचुनी स्वये शत्रूंना मारणारा
करे द्वंद्व आव्हान जो म्लेंच्छतेला म्हणे धर्म रक्षावया जन्म झाला
मराठा म्हणावे अशा वाघराला।। १५।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२३।।
खडे सैन्य घेई अटकपार जाई नदी सागराच्या कडे धाव घेई
जिथे म्लेंच्छ भेटे तिथे सूड घेई सुगंधाकडे भृंग ही झेप घेई
सदा धाव ज्याची असे उत्तरेला तसा धावतो शत्रू निर्दाळण्याला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१६।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२४।।
महा साहसेची महा धैर्यतेची धनाच्या रुपाच्याहूनी मानी शील
महा कर्तृत्वाची महा शूरतेची खलाच्या पुढे ना कधी ही झुकेल
त्वरे देणगी मागतो जो हरीला त्यजे स्वाभिमानार्थ ही जीवनाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१७।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२५।।
सुधांशूस पाहता उफाळे समुद्र भरारी गरुडाची बुद्धी कृतीत
अफजल्यास पाहता शिवरायरक्त अभयता वनेंद्राची ही अंतरात
पाहताच संतापतो पाकड्याला असे राजहंसवत कृती बोलण्याला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१८।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२६।।
झुके ना कधी संकटांच्या समोर दमे ना थके ना झुके ना हटे ना
रणी खंडते ना कधी खडगधार कधी हिंदवी राज्यमार्गी ढळे ना
हरीची कृपा मानितो संकटाला निराशा न स्पर्शे कधीही उराला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१९।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२७।।
करे भगव्या झेंड्यासवे पूर्ण वारी विषाच्याहूनी ही कडू जो अमाप
तसा म्लेंछनाशार्थ करणार स्वारी तसा अमृताच्याहूनी गोड खूप
उभयतां मध्ये भेद वाटे न ज्याला सहोदरचि शोभे नभी भास्कराला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२०।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२८।।
रणी धाव घेता असे खडगहस्त विपत्तीतही चित्त ज्याचे ढळे ना
विठू वारीसाठी असे टाळ हस्त रणी झुंजता पाठ मागे वळे ना
अलंकार दोन्ही करी टाळ भाला भवानी पदी पूर्णतः वाहिलेला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२१।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२९।।
फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभुंना मरण की शरण हा जधी प्रश्न ठाके
तसा चित्ती ध्यातो शिवा काशीदांना स्वधर्मास्तावे जो सहज देह त्यागे
सदा सिद्ध त्रयीवत् तनू झोकण्याला उरी सूर्य आदर्श संभाजी ठेला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२२।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३०।।
जगी रंजले गांजले कोणी प्राणी सुखासीनतेचा असे हाडवैरी
निवारी तयांची त्वरे दुःख खाणी अथक कर्मयोगात घेई भरारी
कुणाच्याही दुःखावरी घाली घाला रवी जान्हवीच्या कुळी जन्मलेला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३१।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३९।।
म्हणे बाप माझा असे पंढरीत रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले
आई राहते नित्य तुळजापुरात कटू सत्य हे चित्ती ज्याच्या उमगले
तयां दर्शनासाठी आतुरलेला तदर्थी धरी बंदूक खडग भाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३२।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४०।।
कुणी निंदती देश धर्मास दुष्ट क्लिबांची अहिंसा तसे ब्रम्हचर्य
अशांना झटे पूर्ण करण्यास नष्ट स्वधर्मा स्वदेशास्तवे नष्टचर्य
असे आर्तता धर्मसंस्थापण्याला लाथाडतो थुंकतो गांधीतेला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३३।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४१ ।।
जरी व्याघ्रसा सिंहसा देहभाव कुणी क्रूर भेटे बने लक्ष क्रूर
परी अंतरी आर्तसा भक्तिभाव त्वरे मारतो पोट फाडूनी ठार
सदा देश धर्मार्थ आसुसलेला शिवाजी जसे फाडती अफजल्याला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३४।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४२।।
मनी जागृती स्वप्नी ही राष्ट्रचिंता आधी कोंढाण्याचे लगीन लावण्याला
झटे निर्मिण्या हिंदवीराज्य सत्ता मुलाचे त्यजून धाव घेई गडाला
शिवाजी आकांक्षांस्तवे जन्म झाला स्वतःच्याहूनी मायभू श्रेष्ठ ज्याला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३५।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४३।।
स्मरे श्वास घेता जिजाऊसुताला भले शत्रूची माय कांता बहीण
उरी आठवितो सईच्या सुताला तिला मानतो जन्मतः माय बहीण
समजतो तृणासारिखे जो जिण्याला अशी धर्मश्रद्धा उरी बाणलेला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३६।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४४।।
असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त असे सर्वसाक्षी पुऱ्या संस्कृतीचा
तसा शारदापुत्रवत जो प्रबुद्ध खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा
पदी मारुतीवत असे जो गतीला न सोडी अशा दिव्य भगव्या ध्वजाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३७।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४५।।
उताराकडे वाहते नित्य पाणी शिके गर्भावासात झुंजाररीत
विकाराकडे धावती सर्व प्राणी लगीन खडगसंगे पडे उदरात
नसे तोड ज्याच्या जगी संघर्षाला वधाया सदा सिद्ध म्लेंच्छासुराला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३८।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४६।।
नभी ज्या क्षणी होतसे गडगडाट जसा कर्मयोगी तसा ज्ञानवंत
वनी तत्क्षणी डरकाळे सिंहनाद जरी भक्तियोगी मनाने ज्वलंत
तसा डरकाळून मारितो दुश्मनाला जिणे मायभूमीपदी अर्पिलेला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४७।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५५।।
स्वधर्मावरी करता कोणी आघात पुरा ठार मारावया शाहिस्त्याला
तसा मायभूला करे कोणी घात घुसुनी लालमहाली करे खड्गहल्ला
भिडे आग पायातली मस्तकाला भीती स्वप्नी ना स्पर्शते काळजाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४८।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५६।।
लगीन रायबाच्या आधी कोंढाण्याचे स्वयंस्फूर्त उत्साही जो धैर्यशील
कराया गडी प्राण देतो स्वतःचे मनाने नभासारखा ही विशाल
नरव्याघ्र तानाजी आदर्श ज्याला कृती उक्तीने पाळतो सत्यतेला
मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।४९।। मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।५७।।
शिवा काशीदांचा असामान्य त्याग घणाघात घालू मुघलतख्त फोडू
मला ही असा लाभूदे कर्मयोग पुरे जाळुनी राख पाताळी गाडू
असे मागतो नित्य तुळजपदाला अटकपार दौडण्यास आसुसलेला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५०।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५८।।
जगावे शिवाजी सुटावे जिवंत मनी खदखदे म्लेंच्छ संताप चिड
स्वये बैसतो मृत्यूच्या पालखीत आतुर घ्यावया शत्रूचा पूर्ण सूड
शिवा काशीदांच्या धरे जो पथाला सदा म्लेंच्छनाशार्थ आसुसलेला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५१।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५९।।
निखाऱ्यातूनी हासत चालणारा नसे शत्रूसुडाहूनी श्रेष्ठ धर्म
विना ढाल शत्रूसवे झुंजणारा घडे धर्मरक्षण जरी जाण मर्म
भितो मृत्यू ही स्पर्श करण्या जयाला रणी देश रक्षण्यासही वाहिलेला
मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।५२।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६०।।
तृषा भागवितो पिऊनी तृषेला सुखाच्या स्तवे जो न लाचार श्वान
क्षुधा भक्षुनी संपवितो क्षुधेला उरी धमणी ठोक्यास्तवे राष्ट्रध्यान
तिन्ही ईषणाही पराभूत केला सदा चित्ती ध्यातो वढू रायगडाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५३।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६१।।
जगी धर्म मानी वचन पाळण्याला वसे रोमरोमी स्वधर्माभिमान
कृती उक्तीमाजी असे एकरूप चले श्वास श्वास शिवबासमान
वचनपूर्ततेच्या विना घे न झोप जिणे अर्पिले पूर्णतः मायभूला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५४।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६२।।
कुणी वीट मारे दगड हेच उत्तर
दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर
स्वये होई वणवा गिळाया आगीला
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६३।।