top of page
।। जय जय महाराष्ट्र माझा ।।
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ।।ध्रु।।
रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भिमथडीच्या तट्टांना या
यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ।।१।।
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हांत शिजला
निढळ्याच्या घामानें भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त फोडतो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ।।२।।
भिती न आम्हां तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ।।३।।
bottom of page