top of page
।। आम्ही गड्या डोंगरचं राहणा ।।
आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार ।।ध्र।।
निशाण भगवे भूवरी फडके । शत्रूचे मग काळीज धडके ।
मावळे आम्हीच लढणार । चाकर शिवबाचं होणार ।।१।।
तानाजी तो वीरच मोठा । लढता लढता पडला पट्ठा ।
परी नाही धीरच सोडणार । चाकर शिवबाचं होणार ।।२।।
संताजी धनाजी रणांत दिसता । शत्रू पळे प्रतिबिंब पाहता ।
घोडं नाही पाणीच पिणार । चाकर शिवबाचं होणार ।।३।।
बाजीराव तो वीरच मोठा । कणसं खाऊनी लढला पट्ठा ।
घोडं तो दौडीत सोडणार । चाकर शिवबाचं होणार ।।४।।
जगदंबेच्या कृपाप्रसादे । शिवप्रभूंच्या पुण्याई ।
आई भवानीच्या आशिर्वादे । म्होरं म्होरं आम्हीच जाणार ।
चाकर शिवबाचं होणार ।।५।।
bottom of page