top of page

।। वेडात मराठे वीर दौडले सात ।।

म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात ।।ध्रु।।

 

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओलें

सरदार सहा सरसावूनी उठले शेले

रिकीबींत टाकले पाय झेलले भाले

उसळले धुळीचे मेघ सात निमिंशात

वेडात मराठे वीर दौडले सात ।।१।।

 

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना

अपमान बुझविण्या सात अर्पुनी माना

छावणीत शिरले थेट भेट गनिमांना

कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात ।।२।।

 

खालून आग वर आग बाजूंनी

समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी

गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात ।।३।।

 

दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा

ओढ्यात तरंगे अजुनी मेघ मातीचा

अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात ।।४।।

bottom of page