top of page

।। भगवा झेंडा प्राण माझा, भगवा झेंडा प्राण ।।

 

भगवा झेंडा प्राण माझा, भगवा झेंडा प्राण ।।

जीवनाची आण माझ्या जीवनाची आण ।।ध्र।।

 

डुलते कशी पहा रायाची स्वारी ।

खुशींत आला राया डुलतोया भारी ।

मेतियांची खाण माझी मोतियांची खाण ।।१।।

 

याच्याच छायेखाली हिंदुवीरानीं ।

गनिम पिटळिलं पाजून पाणी ।

माझ्या अंगीं त्राण त्येचं माझ्या अंगी त्राण ।।२।।

 

अन्यायाची आता येई शिसारी ।

घेऊन हातामधी नंग्या समशेरी ।

करू दाणादाण सारी करू दाणादाणा ।।३।।

 

साऱ्या गांवामधीं वेशीवेशीला ।

प्रांता प्रांताला अन् साऱ्या देशाला ।

मांडून बसला ठाण आतां मांडून बसला ठाण ।।४।।

 

ग्यानबा तुकाराम विठू रखूमाई ।

याच्यांत दिसती मला काशी गंगाई ।

गेलं हरपून भानं माझं गेलं हरपून भानं ।।५।।

bottom of page