top of page

|| शूर आम्ही सरदार ||

 

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

देव, देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती ।।

 

आईच्या गर्भात उमगली झुंजारची रीत ।

तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत ।

लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती ।

देव, देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती ।। १।।

 

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

देव, देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती ।।

 

जिंकावे वा कटून मरावे हेच आम्हाला ठावं ।

लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं ।

देशापायी सारी विसरू माया ममता नाती ।

देव, देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती ।। २।।

 

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

देव, देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती ।।

bottom of page