top of page

।। लववेना हें शिर मातें ।।

 

होतात देऊळे नष्ट । होतात देवता भ्रष्ट ।

गो ब्राम्हण ओरडती । धर्मावरती संकष्ट ।

न्याय नीती उरली नाही । सारेच भोगिती कष्ट

हा घोर मांडीला ज्यांनी । त्यांचिया पुढे जाउनी ।

देशाभिमान सोडोनि । प्रेमाच्या मंगल मते ।।

।। लववेना हें शिर मातें ।।१।।

 

तूं सांग ! तुझ्या चरणाशी । हि तोडून ठेवीन मान ।

तूं सांग ! तात चरणाशी । कोपोनि ठेवीन मान ।

गो ब्राम्हण यांच्या करिता । खड्गावर ठेवीन मान ।

परी परके सत्ताधारी । गृही शिरून झाले वैरी ।

बघताच तयांना भारी । सक्रोध वृत्ती मम होते ।।

।। लववेना हें शिर मातें ।।२।।

 

मी म्हणता नाही नाही । दरबारी नेले आई ।

जों आंत शिरोनी पाही । वर चढोनि गेली भुवई ।

मुजऱ्याला हात न वाही । शीर लववू शकलो नाही ।

हें सिंहासन कोणाचे ?। हें वैभव तरी कोणाचे ?।

काहूर मनीं प्रश्नांचे । अपहारी नृपसत्तेते ।

।। लववेना हें शिर मातें ।।३।।

 

एकटाच रात्री बसतो । मी जन्मभुस आठवतो ।

ढळढळा आई गे रडतो । त्वेषाने क्षणी संचरतो ।

झोपेत देशबंधूंच्या । दुःखाने दचकून उठतो ।

बोलते भवानी उठ । बोलते जन्मभू उठ ।

"धर समशेरीचा मूठ" । अवमानून त्या आज्ञेते ।।

।। लववेना हें शिर मातें ।।४।।

 

 

देशाचा राजा नाही । राजनिष्ठा होऊ कैसा ।

धर्माचा राजा नाही । राजभक्त होऊ कैसा ।

या उलट्या बोध गळाते । जीवाचा आडके मासा ।

ज्या शिरी भार देशाचा । ज्या शिरी भार धर्माचा ।

कर्तव्यें वाहायाचा । विसरून देऊशधर्मातें ।

।। लववेना हें शिर मातें ।।५।।

 

 

स्वाभिमान सुटला ज्यांचा । देशभक्ती सुटली ज्यांची ।

कुलकीर्तीचा इतिहास । स्मृती देई न उज्वलतेची ।

वाढवोत ते ते शोभा । दास्याच्या दरबाराची ।

उद्दाम म्हणो कुणी मातें । कि करोत उपहासातें ।

परी जागोनी स्वतवतें । हिंदुद्वेषी या तख्ताते ।।

।। लववेना हें शिर मातें ।।६।।

 

 

सुलतान जाहला क्रुद्ध । उमराव जाहले क्रुद्ध ।

जातिवंत झाले स्तब्ध । जनकही होय हतबद्ध ।

परी तुझी आणि अंबेची । शिरी कृपा असावी शुद्ध ।

मावळचे जमवून भाई । स्थापीन मराठेशाही ।

गाडीन आदिलशाही । बोलतो सत्य जे गमतें ।।

।। लववेना हें शिर मातें ।। ७।।

bottom of page