top of page
।। हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ।।
हे हिंदुशक्ती संभूत दीप्तितम तेजा ।
हे हिंदूतपस्या पूत ईश्वरी ओजा ।
हे हिंदुश्री सौभाग्य भूतीच्या साजा ।
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ।।
करी हिंदुराष्ट्र हे तूते वंदना ।
करी अंतःकरणज तुज, अभिनंदना ।
तव चरणी भक्तिच्या चर्ची, चंदना ।
गुढाशा पूर्वी त्या न कथू शकतो ज्या ।
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ।।१।।
जी शुद्धी हृदयाची रामदास शीर डुलवी ।
जी बुद्धी पांच शाह्यांस शत्रूच्या झुलवी ।
जी युक्ती कुटनीतीत खलांसी बुडवी ।
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी ।
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ।।२।।
ती शुद्ध हेतूची कर्मे, राहूं दे ।
ती बुद्धी भाबड्या जीवा, लाभू दे ।
ती शक्ती शोणितामाजी, वाहूं दे ।
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या ।
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ।।३।।
bottom of page