top of page

या रे या वीर या शूर या धीर या ।।धृ।।

 

या रे या वीर या शूर या धीर या ।।धृ।।

थु जिनगानी गुलामीची, मायभूमीचे शिपाई या ।।

 

या रे या वीर या शूर या धीर या ।।धृ।।

 

पोटापायी जमीन कसतो, देशापायी कमर बांधतो ।

भगवा झेंडा उंच उंच तो फोडून जाईल गगना या ।

 

या रे या वीर या शूर या धीर या ।।धृ।।

 

कुणी भाला घ्या, कुणी बिजली घ्या ।

भाला घ्या रे भाला घ्या , बिजली घ्या रे बिजली घ्या ।

कोणी फरशी घ्या, परजा कोणी तलवारी परजा,

कोणी तलवारी परजा ।

 

या रे या वीर या शूर या धीर या ।।धृ।।

 

सह्यद्रीचा सिंह गर्जतो, देश धर्म हा हाक मारतो ।

स्वतंत्र्याचे शिंग फुंकितो, श्री शिवाजी राजा ।

 

या रे या वीर या शूर या धीर या ।।धृ।।

 

जय भवानी आवाज उठला, अवघा हिंदु जागा झाला ।

विशालगडची वाट चालला, बाजीप्रभूंना स्मरावया, स्मरावया ।

 

या रे या वीर या शूर या धीर या ।।धृ।।

bottom of page