|| छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ||
छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा
त्रिवार जयजयकार त्रिवार जयजयकार ।।धृ।।
हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनिया गाजवी समरांगण
आई भवानी प्रसन्न होऊन देई साक्षात्कार
धर्माचा अभिमानी राजा, देशाचा संरक्षक राजा
चारित्र्याचा पालक राजा, घडावी देशोद्धार ।।१।।
छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा
त्रिवार जयजयकार त्रिवार जयजयकार ।।धृ।।
स्फूर्तिकेंद्र हे भारतीयांचे, दैवत आमुच्या महाराष्ट्राचे
आद्य प्रवर्तक संघटनेचे, सदा विजयी होणार
पुजा बांधू सामर्थ्याची, इच्छापूर्ती श्रीशिवबाची
उठता उर्मी समर्पणाची, काय उणे पडणार ।।२।।
छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा
त्रिवार जयजयकार त्रिवार जयजयकार ।।धृ।।
प्रभात झाली शिवशाहीची, जाणीव होई हिंदुत्वाची
घेऊ प्रतिज्ञा शिवधेयची नको आता माघार ।।३।।
छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा
त्रिवार जयजयकार त्रिवार जयजयकार ।।धृ।।