top of page

।। शेत  बी माझं बैल बी माझं ।।

 

शेत  बी माझं बैल बी माझं जोडी खिलारी ।

हे गाव बी माझं खपून इथं खातो न्याहारी ।

गड्या . . . . . खातो न्याहारी ।।धृ।।

 

गावमंदी समदं आम्ही एक दिलाचं ।

कुठंबी असू हिन्दू आम्ही एक गुणाचं ।

देऊळ राऊळ समदं माझ्या सोनं शनिवारी ।

गड्या . . . . . सोनं शनिवारी ।।१।।

 

शेत  बी माझं बैल बी माझं जोडी खिलारी ।

हे गाव बी माझं खपून इथं खातो न्याहारी ।

गड्या . . . . . खातो न्याहारी ।।धृ।।

 

माझ्यापरी कितीक गडी हेच बोलती ।

बोलालाबी मोल तसं तसंच चालती ।

शिवाजीचं राज्य व्हनार मोठं इचारी ।

गड्या . . . . . मोठं इचारी ।।२।।

 

शेत  बी माझं बैल बी माझं जोडी खिलारी ।

हे गाव बी माझं खपून इथं खातो न्याहारी ।

गड्या . . . . . खातो न्याहारी ।।धृ।।

 

मायेचा बी पूत येवो झुंज खेळाया ।

नांगराचा फाळ घुसलं मुंडी खुडाया ।

वेशीवर भगवा झेंडा घेई भरारी ।

गड्या . . . . . घेई भरारी ।।३।।

 

शेत  बी माझं बैल बी माझं जोडी खिलारी ।

हे गाव बी माझं खपून इथं खातो न्याहारी ।

गड्या . . . . . खातो न्याहारी ।।धृ।।

bottom of page