top of page

। शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला ।।

 

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला ।

शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला |

पळाला पळाला कोथळा टाकून पळाला |

शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला ||१||

 

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला ।

शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्य पळाला |

पळाला पळाला बोटं टाकून पळाला |

शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्य पळाला ||२||

 

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला ।

धर्मवीरांचे नाव घेता औरंग्या पळाला |

पळाला पळाला टोप्या टाकून पळाला |

धर्मवीरांचे नाव घेता औरंग्या पळाला ||३||

 

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला ।

तानजींचे नाव घेता उदयभान पळाला |

पळाला पळाला तलवार टाकून पळाला |

तानाजीचे नाव घेता उदयभान पळाला ||४||

 

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला ।

मुरारबाजीचे नाव घेता दिलेरखान पळाला |

पळाला पळाला कोथळा टाकून पळाला |

मुरारबाजीचे नाव घेता दिलेरखान पळाला ||५||

bottom of page