top of page

।। मर्द मराठा भडकला ।।

शिवरायांचा महारथी तो, रणमैदानी थडकला

मर्द मराठा भडकला तेंव्हा भगवा झेंडा फडकला ।।धृ।।

महाराष्ट्राची राखण्या शान, शिवशाही केली स्थापन

तुळजाआईची घेऊन आन, पेलले भले आव्हान

शिवरायांचा सेनापती तो, अन्यायावर तडकला

मर्द मराठा भडकला तेंव्हा भगवा झेंडा फडकला ।।धृ।।

जय भवानी . . . . . . . जय शिवाजी

शिवरायांनी नेमकं हेरलं, तरण्या पिढीला आधी पुकारलं

नसानसात चैतन्य भरलं , क्रांतीचं हे वारं पसरलं

रणांगणी त्या ललकारूनि, रिपुदलाला धडकला

मर्द मराठा भडकला तेंव्हा भगवा झेंडा फडकला ।।धृ।।

अन्यायाचीच करण्या होळी, दिली वाघापरी डरकाळी

संग सेना ती मराठमोळी, भगवा मानाने डोळे आभाळी

शिवरायांच्या रणनितीने, वैरी कांडीत अडकला

मर्द मराठा भडकला तेंव्हा भगवा झेंडा फडकला ।।धृ।।

राजा लाभला तो दमदार, दिलं नेतृत्व तडफदार

शिवरायांचा खंबीर, आहे महाराष्ट्राला आधार

ठोकून दंड केला या थंड, खानाला फाडून फडकला

मर्द मराठा भडकला तेंव्हा भगवा झेंडा फडकला ।।धृ।।

bottom of page