top of page

।। ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृति ।।

 

ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृति

रोज अरुण चंद्रमा आरतीस उगवती ।। ध्रु।।

 

धरुणी अभय सावली मायभूमिच्या शिरीं

हा युगें युगें उभा अचलराज हिमगिरी

चरणि अध्र्य द्यावया सिंधुलहरी उसळती  ।।१।।

 

शब्द स्वप्निही दिला तरिहि तो ठरो खरा

म्हणुनि राव रंक हो ही इथे परंपरा

पितृवचन पाळण्या विजनवाीिं रघुपती ।।२।।

 

धर्मराज तो तया भीम पार्थ वंदिती

देव सूत होऊनी कर्मयोग सांगती

ज्ञानियामुखें इथें बोलतें सरस्वती ।।३।।

 

याच भूवंरी जिजा शिवनृपास वाढवी

श्रीसमर्थवैखारी राश्ट्रधर्म जागवी

नीति नांदते इथें सिध्द शक्ति सांगती ।।४।।

  • w-facebook
  • Twitter Clean
  • w-flickr
bottom of page