top of page
।। देशासाठी जगायचं रं ।।
देशासाठी जगायचं रं
शिवबानं सांगावा धाडलाय रं
वेळ पडली तर मरायचं रं
धर्मासाठी झुंजायचं रं ।।ध्रु।।
देवाधर्माची आन हाय
बेईमान कोणी होयाचं नाय
आपलं ईमान सोडायचं नाय
येका दिलानं नांदायचं रे
देशासाठी जगायचं रं ।।१।।
तोरणां घेऊन राजानं
तोराण बांधलं राज्याचं
आई भवानीच्या पुण्याईचं
स्वराज्य होया मर्दानुरं
देशासाठी जगायचं रं ।।२।।
शिवाजी राजानं केलं रं काय
खानाचं प्वाट फोडलं रं
मामाची बोट छाटली रं
देवीला बोकडाचा निवदं रं
देशासाठी जगायचं रं ।।३।।
देवी नवसाला पावली रं
रामाचं राज्य आलं रं
रावणाची मस्ती जिरली रं
शिवबाचं राज्य आलं रं
देशासाठी जगायचं रं ।।४।।
bottom of page