top of page

।। जय भवानी । जय शिवराय ।।

जय भवानी जय शिवराय । जय भवानी जय शिवराय ।।ध्रु।।

तूं रक्षियले देशाला । न्याय नीती आदर्शाला ।।

तूं जागविले धर्माला । जय भवानी जय शिवराय ।। १  ।।

 

तूं प्रेरक नवतरूणांचा । तूं प्रतिक चारित्र्याचा ।

राष्ट्रपुरुष या देशाचा । जय भवानी जय शिवराय ।।२ ।।

 

दुष्ट  आक्रमक लाळविले । सज्जनांस तूं वाचविले ।

राज्य हिंदवी स्थापियले । जय भवानी जय शिवराय ।।३ ।।

 

महापराक्रमी तूंच खरा । राजनीती चाणक्य खरा ।

त्यागाचा आदर्श खरा । जय भवानी जय शिवराय ।।४ ।।

 

जात पात तुज मान्य नसे । प्रांतभेद तुज ठाव नसे ।

हिन्दूधर्म स्वतंत्र असे । जय भवानी जय शिवराय ।।५ ।।

 

देशाच्या एकत्वाचे । ध्येयपूर्तता करण्याचे ।

राज्य हिन्दवी मोलाचे । जय भवानी जय शिवराय ।।६ ।।

 

शिवरायांचा जयजयकार । जिजाआऊंचा जयजयकार ।

भारतभूचा जयजयकार । भगव्या ध्वजाचा जयजयकार ।।७।।

 

। जय भवानी जय शिवराय ।।

bottom of page